‘मुंबई बँके’च्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड !

मविआच्या काळात बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल भोसले यांची निवड करण्यात आली होती. सत्तापालटानंतर दोघांनीही अचानक राजीनामे दिले होते.

संभाजीनगर येथील पाणीप्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे महापालिकेच्या बाहेर ‘आमरण उपोषण’ !

शहरात भीषण पाणीप्रश्न असतांना महानगरपालिकेने मागील १० वर्षांत अर्थसंकल्पात पाण्यासाठी अत्यल्प तरतूद केली होती. चालू वर्षीही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यांसह इतर गोष्टींवर होणारा व्यय अल्प करून तो शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी करण्यात यावा

पुणे येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीसह त्याच्या आईलाही अटक !

विकृत नराधमांना आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांनाही त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल !

भाजप आणि मनसे दहीहंडी उत्सवातील गोविंदांचा १० लाख रुपयांचा विमा उतरवणार !

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवात सहभागी होणार्‍या गोविंदांना भाजपने राज्यस्तरावर, तर मनसेने नवी मुंबई स्तरावर १० लाख रुपयांचा विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे आणि मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतियांचा बंदोबस्त करा ! – करवीर शिवसेना

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वत:हून का नोंद घेत नाही ?

मुंबईतील वाडिया रुग्णालयाला भीषण आग !

रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर शस्त्रक्रिया विभागाच्या ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीनंतर अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी आले असून सायंकाळी ७.१५ वाजता आग विझवण्याचे प्रयत्न चालू होते

महागाईच्या विरोधात विधीमंडळाच्या बाहेर आंदोलन करणारे काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी कह्यात !

सत्तेत असतांना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे आणि निवडणूक हरल्यानंतर जनताभिमुख असल्याचे भासवणे ही सर्वपक्षियांची नीती जनता ओळखून आहे. सत्ताकाळात महागाई रोखण्यासाठी ठोस भूमिका घेतली असती, तर काँग्रेसच्या आंदोलनाला नैतिकता प्राप्त झाली असती !

दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाचे दायित्व पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे दायित्वकडे स्वतःकडे घेतले आहे

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून समन्स !

बलात्कार पीडितेला धमकावल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्या विरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारत विश्वगुरु व्हावा !

गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात असतांना विश्वगुरुपदी विराजमान असणारा भारत सर्वांनाच अभिप्रेत आहे. गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन झाल्यासच ते शक्य होईल. हे सर्वस्वी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या हातात आहे. आदर्श आणि उज्ज्वल भारत घडवण्यासाठी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या पुढील वाटचालीस सर्व भारतियांच्या मनःपूर्वक शुभेच्छा !