अमरावती येथे दोन ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू

अमरावती – अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील ४ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हे ट्रक लोखंडी गज (बार) घेऊन जात होते. अपघातात ट्रकमधील लोखंडी सळ्या ट्रकमधील प्रवाशांच्या शरिरात आरपार घुसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील खड्डा वाचवतांना हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. जवळजवळ ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात दोन्ही ट्रकची पुष्कळ हानी झाली.