बत्तीस शिराळा येथील नागपंचमीला अनुमती द्या ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना

‘‘सांगली जिल्ह्यातील शिराळ्याची नागपंचमी ही भारतीय संस्कृतीची एक वेगळी ओळख असून अनेक वर्षांपासून चालू असलेल्या या परंपरेला जतन करणे आवश्यक आहे. या सणावर मागील काही वर्षांपासून निर्बंध आहेत.

कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना राज्यशासन ५० सहस्र रुपये प्रोत्साहन निधी देणार !

राज्यातील १३ लाख ८५ सहस्र शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी ५ सहस्र ७२२ कोटी रुपये इतका निधी व्यय करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

पोलिसांना घराची चिंता भासणार नाही, असे नियोजन करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘मुंबई महानगर आणि ग्रामीण महाराष्ट्र अशा सर्वच भागांतील पोलिसांना पुरेशा संख्येने घरे उपलब्ध होतील, यासाठी तात्काळ अन् दीर्घ टप्प्याचे नियोजन करा. पोलिसांना घरांची चिंता भासणार नाही, असे नियोजन करा’, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिला.

आक्रमणामागे ‘पी.एफ्.आय.’चा हात आहे का ?  याचा पोलिसांनी छडा लावावा ! – हिंदु जनजागृती समिती

होंडा (गोवा) येथे पेट्रोलपंपावरील हिंदु कर्मचार्‍यावर आक्रमण केल्याचे प्रकरण

‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता अत्यंत निर्भीड आणि पारदर्शक ! – ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार

‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे की, जे जगातील हिंदूंवर दैनंदिन होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम अत्यंत निर्भीडपणे आणि पारदर्शकपणे करत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांनी काढले.

चोडण बेटावरील श्री देवकीकृष्ण मंदिरापासून गोव्यातील उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी चालू करावी ! – चोडणवासियांची मागणी

ख्रिस्ताब्द १५४० ते ख्रिस्ताब्द १५६७ या कालावधीत हे दैवत मये गावातून माशेल येथे स्थलांतरित झाल्याची नोंद आढळते. चोडण बेटावरील सर्व नागरिकांचे श्री देवकीकृष्ण हे प्रमुख दैवत होते आणि आजही आहे.

बीड जिल्ह्यात पुन्हा अवैध गर्भपात; पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद !

पहिली मुलगी असल्याने दुसरी मुलगी नको म्हणून सासरच्या लोकांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

‘होय हिंदूच’ संघटनेकडून ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ !

सिंहगडावर येणार्‍या काही पर्यटकांकडून गडावर मद्यपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी अपप्रकार झाल्याने गडाचे पावित्र्य भंग होते. अशा अपप्रकारांना आळा बसावा, यासाठी ‘होय हिंदूच’ संघटनेकडून २४ जुलै या दिवशी ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ राबवण्यात आली.

भ्रष्टाचार्‍यांना दणका !

सर्वाेच्च न्यायालयाने ‘ईडी’च्या अधिकारांवर मोहोर उमटवून त्यांच्या धडक कारवाईचा मार्ग केवळ प्रशस्तच केला असे नाही, तर त्यास भक्कम बळही दिले आहे. या निकालामुळे ‘ईडी’ला आता कुणाचीही भीडभाड न बाळगता जनतेचा पैसा लाटणार्‍यांना बेधडकपणे कारागृहात डांबणे सहज शक्य होणार आहे.

सनातनच्या साधिका सौ. प्राजक्ता जोशी यांना पितृशोक

सनातनचे साधक श्री. संजय जोशी यांचे ते सासरे, तर संत पू. सौरभ जोशी यांचे ते आजोबा होत. सनातन परिवार दोन्ही जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.