आक्रमणामागे ‘पी.एफ्.आय.’चा हात आहे का ?  याचा पोलिसांनी छडा लावावा ! – हिंदु जनजागृती समिती

होंडा (गोवा) येथे पेट्रोलपंपावरील हिंदु कर्मचार्‍यावर आक्रमण केल्याचे प्रकरण

वाळपई, २७ जुलै (वार्ता.) – होंडा येथील पेट्रोलपंपावरील कर्मचारी महादेव गावकर यांच्यावर २४ जुलै या दिवशी सायंकाळी बिठ्ठोण येथे रहाणारे संशयित कादर शेख आणि सलिम चोरावत यांनी चाकू अन् सुरे यांद्वारे आक्रमण केले. या घटनेनंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. होंडा येथे पेट्रोलपंपावर सशस्त्र आक्रमण करणार्‍या धर्मांधांच्या मागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय.’चा) या आतंकवादाशी संबंधित संघटनेचा हात आहे का ? याचा पोलिसांनी छडा लावावा, तसेच ही गुंडगिरी बंद करण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

नुकतीच मडगाव येथे एका घटस्फोटित ३० वर्षीय महिलेवर अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणात संशयित धर्मांधाने महिलेचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे १० लाख रुपये पळवले आहेत. याविषयी पोलिसात तक्रार झाल्यानंतर संशयित धर्मांध फरार झाला. ही ‘लव्ह जिहाद’ची घटना आहे का ? तसेच यामागेही ‘पी.एफ्.आय.’चा हात आहे का ? याविषयी शासन आणि पोलीस यंत्रणा यांनी चौकशी करावी, अशी समितीने मागणी केली आहे.

आक्रमणकर्त्यांनी क्षमा मागावी ! – ग्रामस्थांची मागणी

होंडा येथील पेट्रोलपंपाच्या कर्मचार्‍यावर सशस्त्र आक्रमण झाल्यानंतर रात्री ‘आक्रमणकर्त्यांना अटक होईपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही’, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला. यानंतर वाळपई पोलिसांनी या प्रकरणी बिठ्ठोण येथे रहाणारे कादर शेख आणि सलिम चोरावत या संशयितांना कह्यात घेतले. ‘संशयितांना होंडा येथे पोलीस ठाण्यावर आणावे आणि त्यांनी सर्वांसमक्ष क्षमा मागावी’, अशी जोरदार मागणी संतप्त होंडावासियांनी केली. पोलिसांनी ही मागणी अमान्य केल्याने होंडावासियांमध्ये तीव्र असंतोष आहे. ‘पोलीस गुन्हेगारांच्या वतीने क्षमा मागू शकतात; मग गुन्हेगार का मागू शकत नाहीत ?’, असा प्रश्न आंदोलन करणार्‍या होंडावासियांनी उपस्थित केला.

केसरीया हिंदु वाहिनीचे राजीव झा यांची त्यांना धमक्या मिळत असल्याची तक्रार

केसरीया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले गोव्यातील राजीव झा यांनी त्यांना सलीम शेख या धर्मांधाकडून फेसबूकवर धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार फोंडा पोलीस ठाण्यात केली आहे. ‘शेख मला मारण्यासाठी लोकांना चिथावणी देत आहे’, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. होंडा येथील पेट्रोलपंपावरील हिंदु कर्मचार्‍यावर आक्रमण करणार्‍यांपैकी सलीम शेख हा एक आहे का ? कि ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची योजना आहे ? असा प्रश्न झा यांनी उपस्थित केला आहे.