पन्हाळागड येथे पर्यटकांना मद्यपान करू देणार्या ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर गुन्हा नोंद !
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर एका झुणका-भाकरी केंद्रावर काही जणांच्या गटाने मद्यपान केले होते. या संदर्भातील एक ‘व्हिडिओ’ प्रसिद्धीमाध्यमांवर प्रसारित झाला होता. याविषयी पोलिसांनी ‘झुणका-भाकरी केंद्रा’च्या चालकावर गुन्हा नोंद केला आहे.