सांगोल्डा येथे मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमी बळकावल्याचे उघड !

सांगोल्डा येथील एका कुटुंबियांच्या सदस्याचे वर्ष १९७६ मध्ये निधन झाले आहे; मात्र संबंधित मृत व्यक्तीच्या नावाने व्यक्ती मृत झाल्यानंतर २४ वर्षांनी ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ (अधिकारपत्र) करून भूमी बळकावल्याचे उघड झाले आहे.

म्यानमार सैन्याकडून माजी खासदारासह ४ जणांना फाशी

म्यानमार सैन्याने एका माजी खासदारासह लोकशाहीसाठी लढणार्‍या चार कार्यकर्त्यांना फाशी दिली. या चौघांवरील आतंकवादी कृत्ये केल्याचे आरोप सिद्ध झाले होते.

अमेरिकेत ६ वर्षांच्या मुलीसह तिचे आई-वडील यांची गोळ्या झाडून हत्या !

अमेरिकेच्या आयोवा राज्यात एका ६ वर्षांच्या मुलीची तिच्या आई-वडिलांसह गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

मी पंतप्रधान बनलो, तर शरणार्थींसाठी धोरण बनवीन ! – ऋषी सुनक

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रयत्नशील असलेले भारतीय वंशांचे ऋषी सुनक यांनी म्हटले आहे की, जर मी पंतप्रधान बनलो, तर शरणार्थींसाठी धोरण बनवीन

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून चिनी लढाऊ विमानांचे उड्डाण !

चिनी ड्रॅगनच्या अशा कुरापतींना ठोस प्रत्युत्तर देण्यासमवेतच ‘तो कुरापती काढणारच नाही’, अशी कणखर भूमिका भारताने घ्यावी, ही अपेक्षा !

बिलारी (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेकरूंचा मार्ग मुसलमान महिलांनी रोखल्याने तणाव

सामंजस्य दाखवण्याचे दायित्व हिंदू पार पाडत आले आहेत. बहुतांश मुसलमान हे सामंजस्य दाखवण्याच्या भूमिकेत नसतात. पोलिसांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

पाकव्याप्त काश्मिरींना स्वातंत्र्य कधी मिळणार ? – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील लोक आतंकवाद आणि फुटीरावाद यांचे बळी ठरत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते सध्या भारताकडे आशेने पहात आहेत.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेत एका महंतांची हेरगिरी करणार्‍या नाझिम याला अटक

मुसलमानांकडून हिंदु संत-महंतांची हेरगिरी करणे, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. ‘हिंदु समाजाला दिशादर्शन करणार्‍या संत-महंतांच्या जिवाचे बरे-वाईट करून हिंदूंना नेतृत्वहीन करण्याचा हा डाव नसेल ना ?’, याची सखोल चौकशी होणे आवश्यक !

मुंबई येथील फौजदारी न्यायालयांची अधिकृत भाषा मराठीच !

मुंबई येथील फौजदारी न्यायालयांची अधिकृत भाषा मराठीच आहे. २५ वर्षांपूर्वीच्या जुन्या अधिसूचनेनुसार कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज मराठी भाषेतच चालेल, इंग्रजी किंवा उर्दू भाषेत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा विशेष ‘मकोका’ न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

गुजरातमध्ये मद्यपान करणार्‍या भाजपच्या नेत्याला द्यावे लागले त्यागपत्र !

राजकीय नेत्यांकडूनच कायद्याचे पालन होत नसल्याने जनता कायदाद्रोही झाल्यास आश्‍चर्य ते काय ?