मेरठ (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेत एका महंतांची हेरगिरी करणार्‍या नाझिम याला अटक

मेरठ (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात २४ जुलै या दिवशी कावड यात्रेच्या वेळी यात्रेकरूंच्या गर्दीत घुसलेल्या नाझिम नावाच्या मुसलमान तरुणाला अटक करण्यात आली. कावड यात्रेमध्ये सहभागी झालेल्या महंत मच्छेंद्र पुरी यांची हेरगिरी करून त्यांची माहिती इतरांना पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कावड यात्रेकरूंनी नाझिम याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. महंत मच्छेंद्र पुरी यांचे शिष्य ब्रह्मानंद पुरी यांनी या घटनेची पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे, ‘मी महंत मच्छेंद्र पुरी यांच्या समवेत हरिद्वारहून कावड घेऊन गाझियाबादमधील शिवमंदिर बालाजी धाम येथे जात होतो. मी पाहिले की, एक अनोळखी व्यक्ती बराच वेळ महंत मच्छेंद्र पुरी यांचा पाठलाग करत होती. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला. तेव्हा इतर यात्रेकरूंच्या साहाय्याने आम्ही त्याला पकडले.’ (एखादा हिंदू कधी मुसलमानांच्या मिरवणुकीमध्ये घुसून त्यांच्या धर्मगुरूंची हेरगिरी करण्याचे धाडस करू शकेल का ? – संपादक) ‘‘महंत मच्छेंद्र पुरी यांच्या सुरक्षेविषयी आम्ही चिंचित आहोत. नझिम याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे’’, असेही ब्रह्मानंद पुरी यांनी ‘ऑपइंडिया’शी बोलतांना सांगितले.

संपादकीय भूमिका

मुसलमानांकडून हिंदु संत-महंतांची हेरगिरी करणे, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. ‘हिंदु समाजाला दिशादर्शन करणार्‍या संत-महंतांच्या जिवाचे बरे-वाईट करून हिंदूंना नेतृत्वहीन करण्याचा हा डाव नसेल ना ?’, याची सखोल चौकशी होणे आवश्यक !