अमेरिकेत ६ वर्षांच्या मुलीसह तिचे आई-वडील यांची गोळ्या झाडून हत्या !

प्रतीकात्मक छायाचित्र

डेमॉईन (अमेरिका) – अमेरिकेच्या आयोवा राज्यात एका ६ वर्षांच्या मुलीची तिच्या आई-वडिलांसह गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सारा आणि टायलर श्मिट अन् त्यांची मुलगी लुला यांचे मृतदेह ‘माकोकेटा केव्ह्ज स्टेट उद्याना’मधील त्यांच्या तंबूत सापडले. अँथनी ऑर्लंडो शेरविन असे गोळीबार करणार्‍याचे नाव आहे. त्याने तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वत:वर बंदूक रोखली. त्याचा मृतदेहही उद्यानात सापडला. या घटनेचा पुढील तपास चालू आहे, असे आयोवा गुन्हे अन्वेषण विभागाचे साहाय्यक संचालक मिच मोर्टवेड यांनी म्हटले आहे. या दांपत्याचा ९ वर्षांचा मुलगा या आक्रमणातून वाचला.