लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रयत्नशील असलेले भारतीय वंशांचे ऋषी सुनक यांनी म्हटले आहे की, जर मी पंतप्रधान बनलो, तर शरणार्थींसाठी धोरण बनवीन. ब्रिटनमध्ये किती शरणार्थींना आश्रय द्यायचा, याचा निर्णय संसदेत घेतला गेला पाहिजे. अवैधरित्या आलेल्या शरणार्थींना आणि गुन्हेगारी कारवाया करणार्यांना परत न घेणार्या संबंधित देशांना देण्यात येणारे साहाय्य थांबवले जाईल.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांच्यासमोर परराष्ट्र मंत्री लिज ट्रस यांचे आव्हान असून या शर्यतीत ट्रस या आघाडीवर आहेत.