मुसलमान महिलाही हिंदुद्वेषी कारवायांमध्ये पुढे असतात, हे जाणा !
बिलारी (उत्तरप्रदेश) – मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारीमधील इब्राहिमपूर गावामध्ये काही धर्मांध मुसलमान महिलांनी कावड यात्रा रोखली. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या धर्मांध महिलांनी वाटेत मोठमोठ्या खाटा टाकल्या आणि मागे उभ्या राहून रस्ता बंद केला. या वेळी हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये बराच वेळ वादावादी चालू होती. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले. बिलारीचे पोलीस उपअधीक्षक आणि मुख्याधिकारी यांनी गावातील दोन्ही समुदायांच्या लोकांची बैठक घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. (पोलिसांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कुरापती काढून हिंदूंच्या यात्रेमध्ये विघ्न आणणार्या मुसलमानांवर कारवाई केल्यास समाजात शांती नांदेल ! – संपादक) प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर परस्पर संमती साधून कावड यात्रेकरूंना मार्ग मोकळा करून देण्यात आला.
कावड यात्रेकरूंनी त्यांना निश्चित करून दिलेल्या मार्गावरून कावड यात्रा न काढल्यास मोहरमची मिरवणूक काढू, अशी धमकी धर्मांध महिलांनी दिली. (उद्दाम मुसलमान महिला ! – संपादक) घटनास्थळी पोचलेले पोलीस अधीक्षक विद्यासागर मिश्रा यांनी सांगितले की, गंगाजल घेऊन आलेल्या कावड यात्रेकरूंमध्ये आणि गावातील धर्मांधांमध्ये परस्पर सामंजस्य नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. (सामंजस्य दाखवण्याचे दायित्व हिंदू पार पाडत आले आहेत. बहुतांश मुसलमान हे सामंजस्य दाखवण्याच्या भूमिकेत नसतात. पोलिसांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन ! – संपादक)