चिनी आस्थापन ‘ओप्पो’कडून ४ सहस्र ३८९ कोटी रुपयांची करचोरी !

‘शाओमी’, ‘विवो’नंतर आता ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनांकडून अशा प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. यावरून अशा आस्थापनांना भारतातून हद्दपार करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

रा.स्व. संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष मुक्तता !

निर्दोषांना गेल्या १४ वर्षांत जे काही भोगावे लागले त्याविषयी त्यांना हानीभरपाई मिळायला हवी. या संदर्भात आता केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक आहे !

नूपुर शर्मा यांच्या समर्थकांच्या हत्येसाठी पाकने सामाजिक माध्यमांद्वारे दिले ४० लोकांना प्रशिक्षण !

तालिबानी आतंकवादी ज्या प्रमाणे शिरच्छेद करत, त्या धर्तीवर शिरच्छेद करणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले होते.

मुंद्रा (गुजरात) बंदराजवळ सापडले ३७६ कोटी रुपयांचे हेरॉइन !

या बंदराजवळ सापडलेले अमली पदार्थ इतके आहे, तर जे सापडले गेले नसेल आणि जे देशभरात पोचले असेल, ते किती असेल, याची कल्पना करता येत नाही !

विदेशी निधी मिळणार्‍या स्वयंसेवी संस्था देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी कार्यरत ! – गुप्तचर विभाग

अशा सर्व स्वयंसेवी संस्था या राष्ट्रघातकीच होत ! अशांच्या अनुज्ञप्त्या रहित करून त्यांच्यावर बंदीच आणली पाहिजे, तसेच संबंधित विश्‍वस्त, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

पुणे येथील सनातनच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता पाटील यांचा ६३ वा वाढदिवस

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना निमंत्रण !

या वेळी सौ. वनजा यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रणपत्रिका आणि कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा गुरुपौर्णिमा विशेषांक देऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. ते मुख्यमंत्र्यांनी अत्यंत जिज्ञासेने आणि मनापासून ऐकले.

चारचाकीतील महागड्या वस्तू चोरणार्‍या टोळीच्या प्रमुखाला अटक !

काचेवर टकटक करून अथवा पैसे पडल्याचे चालकांना सांगून चारचाकीतील महागड्या वस्तू चोरणार्‍या टोळीच्या प्रमुखाला मुंबई पोलिसांनी तमिळनाडूतून अटक केली. लक्ष्मण एस्. कुमार (वय ३५ वर्षे) याला पकडण्यासाठी २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रीकरण पडताळून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.

गोल मशिदीच्या अनधिकृत बांधकामाविषयी निर्णय घ्या !

जालना येथील गोल मशिदीच्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २ सप्ताहांत निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिले आहेत.