मुंद्रा (गुजरात) बंदराजवळ सापडले ३७६ कोटी रुपयांचे हेरॉइन !

मुंद्रा (गुजरात) – येथील अदानी समुहाच्या मालकीच्या बंदराजवळ आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत ७५ किलो ३०० ग्राम हेरॉइन जप्त करण्यात आले. याचे मूल्य ३७६ कोटी ५० लाख रुपये इतके आहे.

ते एका कंटेनरमध्ये ठेवण्यात आले होते. तो कंटेनर १३ मे या दिवशी संयुक्त अरब अमिरातमधून आला होता. यातील माल पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होता. याच बंदरावरून १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी ३ सहस्र किलो अमली पदार्थ पकडले गेले होते. (या बंदराजवळ सापडलेले अमली पदार्थ इतके आहे, तर जे सापडले गेले नसेल आणि जे देशभरात पोचले असेल, ते किती असेल, याची कल्पना करता येत नाही ! – संपादक)