नूपुर शर्मा यांच्या समर्थकांच्या हत्येसाठी पाकने सामाजिक माध्यमांद्वारे दिले ४० लोकांना प्रशिक्षण !

रियाज अत्तारी आणि महंमद गौस यांच्या चौकशीत माहिती उघड

रियाज अत्तारी आणि महंमद गौस यांच्या चौकशीतून माहिती उघड

जयपूर (राजस्थान) – नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणारे उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि राजस्थान आतंकवादविरोधी पथक चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीत पाकिस्तानी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’शी संबंधित आतंकवाद्यांच्या सांगण्यावरून राजस्थानमधील ४० जण नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍यांचा शिरच्छेद करण्यासाठी सिद्ध झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

हे ४० जण राज्यातील ६ जिल्ह्यांतील लोकांना लक्ष्य करणार होते. कन्हैयालाल यांची हत्या करणारे रियाज अत्तारी आणि गौस महंमद यांच्या भ्रमणभाषच्या पडताळणीतून हे तथ्य समोर आलेे. ते पाकमधील १० जणांशी २० भ्रमणभाष क्रमांकांवर संपर्क साधत होते. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सामाजिक माध्यमांतून त्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करून शिरच्छेद करण्यासाठी सिद्ध करण्यात आले होते. तालिबानी आतंकवादी ज्या प्रमाणे शिरच्छेद करत, त्या धर्तीवर शिरच्छेद करणे आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले होते.

दावत-ए-इस्लामीने अजमेरमध्ये वादग्रस्त धार्मिक पुस्तकांचे दुकान उघडले होते. त्यासाठी एका पुस्तक विक्रेत्याला प्रतिदिन ३५० रुपये दिले जात. पुस्तकात आतंकवाद पसरवण्याच्या साहित्याचा उल्लेख होता. रियाज आणि गौस ही पुस्तके वाटत असत, अशीही माहिती समोर आली आहे.