मुंबई – काचेवर टकटक करून अथवा पैसे पडल्याचे चालकांना सांगून चारचाकीतील महागड्या वस्तू चोरणार्या टोळीच्या प्रमुखाला मुंबई पोलिसांनी तमिळनाडूतून अटक केली. लक्ष्मण एस्. कुमार (वय ३५ वर्षे) याला पकडण्यासाठी २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांचे चित्रीकरण पडताळून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.
आरोपीकडून ‘ॲपल’ आस्थापनाचे मॅकबूक आणि भ्रमणसंगणक, ब्लूटूथ स्पीकर असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरोधात मुंबईतील माटुंगा आणि चेंबूर परिसरात अशा प्रकारे चोरी केल्याचे दोन गुन्हे नोंद आहेत. आरोपीचे काही साथीदार मुंबई आणि नवी मुंबई येथे सक्रीय असल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत ! |