परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रांतून दिसणारी असामान्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र !

या छायाचित्रांकडे केवळ समोरूनच नव्हे, तर कुठल्याही दिशेने पाहिले असता ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्याकडेच पहात आहेत’, असे वाटते, तसेच ‘त्यांचे डोके आणि खांदेही आपल्या दिशेने वळत आहेत’, असे जाणवते.

गुरुपौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या ‘विशेष भक्तीसत्संगा’च्या वेळी साधकांना आलेली गुरुतत्त्वाच्या अवतरणाची प्रचीती !

१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. ७ जुलै २०२२ या दिवशी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव असतो. या निमित्ताने ७.७.२०२२ या दिवशी झालेल्या विशेष भक्तीसत्संगात आलेल्या दैवी अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना प्रत्यक्ष गुरुतत्त्वाच्या अस्तित्वाची प्रचीती आली.

पशू-पक्षी सहजतेने सद्गुरूंकडे आकर्षित होणे, हे त्यांच्यातील चैतन्याचे द्योतक !

आपण पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषिमुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. निसर्गही त्या सात्त्विकतेला प्रतिसाद देऊन ऋषिमुनींच्या आश्रमात बहरत असे.