‘जैश-ए-महंमद’चा संस्थापक आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहेब’ संबोधले !

कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणे, आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहब’ संबोधणे, अशा प्रकारे काँग्रेसी नेत्यांचा जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचा इतिहासच आहे. अशा राष्ट्रघातकी काँग्रेसवर आता सरकारने बंदीच आणली पाहिजे !

महाराष्ट्रात विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रेचा निर्णय अध्यक्षांनी घेऊ नये ! – सर्वोच्च न्यायालय

विधानसभेतील आमदारांच्या अपात्रतेविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश ११ जुलै या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या अध्यक्षांना दिले.

डासांसाठी वापरल्या जाणार्‍या ‘कॉईल’मुळे कर्करोगाची शक्यता !

डासांचा त्रास होऊ नये, यासाठी ‘मॉस्क्यूटो रिपेलेंट कॉईल’, डास पळवण्यासाठीची उदबत्ती, ‘इलेक्ट्रिक रिफिल’ यंत्र आदींचा वापर केला जातो. या सर्वांचा धूर फुफ्फुसांना हानी पोचवू शकतो. यामुळे कर्करोग होऊ शकतो !

हिंदु राष्ट्र कोण आणेल ?

‘स्वार्थासाठी मागण्या करणारे नव्हे, तर त्याग करणारेच हिंदु राष्ट्र आणतील !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी समर्पण भावाने सेवा केली पाहिजे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पार पडलेल्या ऑनलाईन सत्संगामध्ये पू. रमानंद गौडा यांनी ‘गुरूंचे महत्त्व, गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, गुरुकुल व्यवस्था, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीय कार्य, सत्पात्रे दानाचे महत्त्व’, यांविषयी मार्गदर्शन केले.

(निवृत्त) एअर मार्शल सतीश इनामदार यांची सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमास भेट !

सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.

भारतीय हिंदु नागरिकाची पाकिस्तानी सहकार्‍याकडून सौदी अरेबियामध्ये हत्या

उत्तरप्रदेशातील जंग बहादूर यादव नोकरीनिमित्त सौदी अरेबियाला गेले असता तेथे त्यांच्या पाकिस्तानी सहकार्‍याने त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या का आणि कशी करण्यात आली, याची विस्तृत माहिती मिळू शकलेली नाही.

भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भूवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

(म्हणे) ‘सरकारी कार्यालयात घातलेली सत्यनारायणाची पूजा ही घटनेची पायमल्ली !’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घातलेली सत्यनारायणाची पूजा म्हणजे भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वाची पायमल्ली आहे, अशी दर्पाेक्ती पुणे येथील मानवी हक्क कार्यकर्ते अधिवक्ता विकास शिंदे यांनी केली.

कोल्हापुरातील शिवसेना कार्यकारिणी विसर्जित !

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारिणीत पालट करण्यात आला आहे, तसेच जुनी कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपूर्वी नवी कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी दिली.