कोल्हापुरातील शिवसेना कार्यकारिणी विसर्जित !

कोल्हापूर, १० जुलै – कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारिणीत पालट करण्यात आला आहे, तसेच जुनी कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपूर्वी नवी कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी दिली. या प्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, कोल्हापुरात पुन्हा पक्ष बांधणीचे दायित्व आमच्यावर असून आम्ही ते सक्षमपणे पार पाडू.