मुंबई – डासांचा त्रास होऊ नये, यासाठी विविध उपाय केले जातात. यासाठी ‘मॉस्क्यूटो रिपेलेंट कॉईल’, डास पळवण्यासाठीची उदबत्ती, ‘इलेक्ट्रिक रिफिल’ यंत्र आदींचा वापर केला जातो. या सर्वांचा धूर फुफ्फुसांना हानी पोचवू शकतो. यामुळे कर्करोग होऊ शकतो, असे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
‘चेस्ट रिसर्च फाऊंडेशन’ने केलेल्या अभ्यासात डास पळवण्यासाठी वापरण्यात येणार्या ‘कॉइल’मध्ये कर्करोग निर्माण करणारे अनेक गुणधर्म आहेत. चीन आणि तैवान येथे झालेल्या अभ्यासातून ‘मॉस्क्यूटो कॉईल’च्या धुराचा कर्करोगासारख्या घातक आजाराशी थेट संबंध आहे. एक ‘कॉईल’ जाळणे, हे १०० सिगारेट ओढण्यासारखे आहे. याच्या धुरामुळे फुफ्फुसांची मोठी होनी होते. सद्यःस्थितीत वापरल्या जाणार्या ‘नो स्मोकिंग कॉईल’मध्ये धूर नसतो; परंतु त्यातून निघणारा पदार्थ शरिरासाठी अत्यंत हानीकारक असतो. वास्तविक धूर नसलेल्या कॉईलमधून भरपूर ‘कार्बन मोनोऑक्साईड’ सोडला जातो. त्यामुळे फुफ्फुसांची मोठी हानी होते.