सभागृहात विलंबाने पोचल्याने काँग्रेसच्या ५ आमदारांना मतदानापासून मुकावे लागले !

बहुमत चाचणीला वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही. वेळेचे गांभीर्य नसलेले असे लोकप्रतिनिधी जनतेची कामे वेळेवर करत असतील का ?

शिवसेनेसमवेत बंडखोरी करणारे कधीही निवडून आले नाहीत ! – अजित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

रिक्शा आणि टॅक्सी चालकांच्या तक्रारी करण्यासाठीची ‘अ‍ॅप’ सुविधा २ वर्षांपासून बंद !

सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही तांत्रिक त्रुटीमुळे ‘ॲप’ २ वर्षे बंद असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल इंधनांवरील कर अल्प केला, तशाच प्रकारचा निर्णय आता महाराष्ट्रात घेतला जाईल. पेट्रोल आणि डिझेल या इंधनांवरील कर लवकरच अल्प करण्यात येणार आहे

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदी येथून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ४ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांचे ठाणे नगरीत जोरदार स्वागत !

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ४ जुलै या दिवशी प्रथमच ठाणे येथे आले. ठाणे येथील समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाणे जिल्ह्याला ‘मुख्यमंत्रीपद’ मिळाल्याने ठाणेकरांनी आनंद व्यक्त केला.

आम्ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवू ! – गुलाबराव पाटील, आमदार

शिवसेना रसातळाला जात असतांना तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. शिवसेना संपत असेल, तर ती वाचवण्याचे दायित्व आमचे आहे. असे प्रतिपादन एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर देतांना केले.

न्याय : सोयीचा आणि विरोधाचा !

‘जे धर्माच्या नावाखाली नेहमीच देशाच्या हिताच्या विरोधात उभे रहातात अशांवर कायदा आणि सुव्यवस्था या कारणामुळे कारवाई करण्यास सरकारही घाबरते. त्यामुळे ही मानसिकता पुढे कायम रहाणार, असेच दिसून येते. तरी सरकारने अशा मानसिकतेवर कडक उतारा शोधण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हे डोईजड होणार, हे नक्की !

मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी २० दिवस शैक्षणिक साहित्यापासून वंचित !

यामागील कारणांचा शोध घेऊन महापालिकेने विद्यार्थ्यांना त्वरित साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि ते न देणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईही करावी !

कोल्हापूर हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा बंदीवान फरार !

हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आणि अभिवचन रजेवर (फर्लोवर) बाहेर पडलेला बंदीवान रवि म्हेत्रे फरार झाला आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून धारावी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.