मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी २० दिवस शैक्षणिक साहित्यापासून वंचित !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – महापालिकेच्या शाळा चालू होऊन २० दिवस होऊनही विद्यार्थ्यांना दप्तर, रेनकोट, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य मिळाले नाही. या प्रकरणी विद्यार्थी आणि पालक यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. शैक्षणिक साहित्याच्या वाटपाला यावर्षी विलंब झाल्यामुळे प्रशासनावर टीका होत आहे.

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी २७ शैक्षणिक वस्तूंचे विनामूल्य वाटप केले जाते; मात्र यंदा अद्याप पुस्तके वगळता अन्य कोणतेही साहित्य देण्यात आलेले नाही. ‘इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यात रेनकोट उपलब्ध होतील’, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

यामागील कारणांचा शोध घेऊन महापालिकेने विद्यार्थ्यांना त्वरित साहित्य उपलब्ध करून द्यावे आणि ते न देणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईही करावी !