मुख्यमंत्र्यांचे ठाणे नगरीत जोरदार स्वागत !

ठाणे, ४ जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ४ जुलै या दिवशी प्रथमच ठाणे येथे आले. ठाणे येथील समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते. शक्तीस्थळाच्या (स्वर्गीय आनंद दिघे यांचे समाधीस्थळाच्या) ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाणे जिल्ह्याला ‘मुख्यमंत्रीपद’ मिळाल्याने ठाणेकरांनी आनंद व्यक्त केला.