पुणे रेल्वेस्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला अटक !

पुणे रेल्वेस्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या प्रभू सूर्यवंशी या व्यक्तीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. प्रभू याने ‘गूगल व्हॉइस सर्च’ वरून पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक शोधून त्यानंतर दूरभाष करून धमकी दिल्याचे उघडकीस झाले आहे.

इस्कॉनच्या वतीने पुणे येथे ३ जुलैला जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन !

पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्या वतीने ३ जुलै या दिवशी दुपारी १२ वाजता जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथून आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे

पाटणा न्यायालयात पुराव्यासाठी आणलेल्या स्फोटकांचाच स्फोट : एक पोलीस शिपाई घायाळ

पुरावा म्हणून न्यायालयात ही स्फोटके आणण्यात आली होती, काही दिवसांपूर्वी पाटणा विश्‍वविद्यालयाच्या वसतीगृहातून ही स्फोटके जप्त करण्यात आली होती.

भारताच्या ‘सिंगल यूज प्लास्टिक’वरील बंदीचे जगभरातून स्वागत !

भारतातील डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन म्हणाले की, मला वाटते ही फार मोठी कल्पना आहे. भारताने या प्लास्टिकवर घातलेली बंदी ही पृथ्वीला मिळालेली मोठी देणगी आहे. भारत या दिशेने मोठे योगदान देत आहे; म्हणूनच मी भारताचे अभिनंदन करतो.

धाराशिव नामांतराच्या निर्णयाचा निषेध

नेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘उस्मानाबाद’ शहराचे पूर्ववत् ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय २९ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला; मात्र या निर्णयाच्या निषेधार्थ धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० पदाधिकार्‍यांनी पक्षाकडे सामूहिक त्यागपत्र दिले आहे.

पुण्याचे नाव ‘जिजाऊनगर’ करण्याची काँग्रेसची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याचा प्रस्ताव संमत करून घेतला.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धात चर्चेच्या माध्यमातून उपाय काढण्याचा पंतप्रधान मोदी यांचा पुनरुच्चार

रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात चर्चा आणि कूटनीती यांच्या माध्यमातून उपाय काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

नूपुर शर्मा यांनी क्षमा मागू नये ! – खासदार गीर्ट विल्डर्स, नेदरलँड्स

‘मला वाटले होते की, भारतात शरिया न्यायालये नाहीत. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी सत्य बोलल्याने त्यांनी कधीच क्षमा मागू नये. उदयपूरच्या घटनेसाठी नूपुर शर्मा नव्हे, तर कट्टरतावादी असहिष्णु जिहादी मुसलमान हेच उत्तरदायी आहेत.

मणीपूरमध्ये झालेल्या भूस्खलनात ७ सैनिकांसह १४ जण मृत्यूमुखी : ५० जण बेपत्ता

ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. राज्यातील नोनी जिल्ह्यात ३० जून या दिवशी झालेल्या भीषण भूस्खलनात ६४ लोक ढिगार्‍याखाली दबले होते.

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथील मंदिरातील शिवपिंडीवर जमा झाला  बर्फ !

ईशान्य भारतात संकट आल्यानंतर असा चमत्कार घडतो ! – पुजार्‍यांची दावा