रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धात चर्चेच्या माध्यमातून उपाय काढण्याचा पंतप्रधान मोदी यांचा पुनरुच्चार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन

नवी देहली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये दूरभाषवरून रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात चर्चा झाली. ३० जून या दिवशी झालेल्या संभाषणात मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात भारताच्या चर्चेतून उपाय काढण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. चर्चा आणि कूटनीती यांच्या माध्यमातून उपाय काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

याआधीही मोदी आणि पुतिन यांची या विषयावर चर्चा झाली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांच्याशीही पंतप्रधान मोदी याआधी बोलले होते.