पुणे – पुणे रेल्वेस्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्या प्रभू सूर्यवंशी या व्यक्तीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. प्रभू याने ‘गूगल व्हॉइस सर्च’ वरून पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक शोधून त्यानंतर दूरभाष करून धमकी दिल्याचे उघडकीस झाले आहे. सूर्यवंशी याने यापूर्वी अशाच प्रकारे वरिष्ठ उच्चपदस्थ राजकीय नेते, मोठे उद्योगपती यांना दूरभाष केले होते. त्याच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाणे आणि वजिराबाद पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद आहेत. (पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी आरोपीला कठोर शिक्षा का केली नाही ? पहिल्यांदाच कठोर शिक्षा केली असती, तर आरोपीचे पुढील गुन्हे करण्याची हिंमत झाली नसती. – संपादक)
सौजन्य लोकशाही
लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले की, या ‘कॉल’मध्ये कोणतीही आतंकवादी संघटना अथवा सामाजिक अराजकता माजवणारे घटक नाहीत. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले असून यापूर्वीही त्याने असे कृत्य केले आहे.