पुण्याचे नाव ‘जिजाऊनगर’ करण्याची काँग्रेसची मागणी

कॅबिनेट मिटीग

पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २९ जून या दिवशी महाविकास आघाडी सरकारची मंत्रीमंडळ बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेकडून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याचा प्रस्ताव संमत करून घेतला, तर काँग्रेसकडून पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करावे, अशी मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी केली. औरंगाबादच्या नामांतरावर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते. काँग्रेसचे २ मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे बैठकीतून निघून गेले होते.