ऐतिहासिक लढाईतून बोध घेऊन युवा पिढीचे राष्ट्रप्रेम जागृत व्हावे ! – फ्रांसुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार

पुणे येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन !

‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खंडोबाच्या भेटीला !

सोपान काकांच्या सासवडमध्ये २ दिवसांच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याने २६ जून या दिवशी जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मल्हारी मार्तंड खंडोबाला भेटण्यासाठी वारकरी मोठे आतुर झालेले असतात.

आषाढी वारीसाठी ४ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या पालख्यांचे आगमन ४ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यात होत आहे. त्या वेळी प्रत्येक पालखीसमवेत महिला पोलिसांचे निर्भया पथक असेल.

ठाणे येथे ५ शिवसेना शाखाप्रमुख आणि युवासेना पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा नोंद

२५ जूनला खासदार श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथे असलेले कार्यालय शिवसैनिकांनी फोडले होते. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दंगलीच्या गुन्हेगारांना अटक !

अनेक धर्मांधांनी गुन्हे करूनही तिस्ता सेटलवाड यांनी त्यांना पाठीशी घातले, त्यांची बाजू घेतली आणि राष्ट्रप्रेमींच्या विरोधात उभ्या ठाकल्या. खोटे पुरावे, प्रसारमाध्यमांना खोट्या मुलाखती, खोटी विधाने करून स्वत:चा डाव साधता येईल, असे त्यांना वाटत असावे; मात्र सत्य हे कधीतरी बाहेर पडतेच !

तासवडे (जिल्हा सातारा) पथकर नाक्यावरील दरवाढीमुळे वाहनधारक संतप्त !

पथकर नाक्यावर केल्या जाणार्‍या दरवाढीवर प्रशासनाचा अंकुश कसा नाही ?

पोलीस ठाण्यांमधील ‘सीसीटीव्ही’मध्ये आता ‘ऑडिओ रेकॉर्डिंग’ची सुविधा !

सोलापूर शहरातील ७ पोलीस ठाण्यांमध्ये तशी सोय करण्यात येत आहे. यामुळे पोलीस ठाण्यात अधिकारी आणि तक्रारदार, तसेच पोलीस अन् आरोपी यांच्यातील संवाद अन् घटनांची वस्तूस्थिती वरिष्ठांना पडताळता येणार आहे.

कल्याण आणि नवी मुंबई येथे ए.टी.एम्. यंत्रे फोडल्याचे प्रकार; दोघांना अटक, ७ जण पसार

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि नवी मुंबई येथील खारघर हद्दीमध्ये अधिकोषांची ए.टी.एम् यंत्रे फोडून फरार झालेल्या ९ जणांच्या टोळीतील सरफुद्दीन रईस खान, उमेशकुमार प्रजापती या कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

इराणमध्ये मुलींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे होणारे हनन जाणा !

इराणच्या शिराज शहरामध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये मुसलमान मुलींनी हिजाब न घालता भाग घेतल्याने त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी स्पर्धेचे आयोजन करणार्‍यांनाही अटक केली आहे.

हुंडाबळी आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याची प्रभावी कार्यवाही !

. . . अशा स्थितीत प्रतिदिन त्रास होत असतांनाही ती महिला माहेरी जाऊ शकत नाही आणि सासरीही राहू शकत नाही, अशी स्थिती निर्माण होते. त्यातून आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. माहेरच्या व्यक्तींवर अवलंबून न रहाता पोलीस तक्रार केली पाहिजे.