पथकर रकमेमध्ये १० ते ४० रुपयांपर्यंत वाढ
सातारा, २६ जून (वार्ता.) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पुणे-बेंगळुरू रस्त्यावर तासवडे पथकर नाक्याच्या ठिकाणी पथकरात १० ते ४० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक संतप्त आहेत.
२५ जूनच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली असून त्याप्रमाणे पथकर वसुलीस प्रारंभही झाला आहे. महामार्गावरील शेंद्रे ते कागल या सीमेतील रस्त्याची देखभाल-दुरुस्ती, तसेच तासवडे आणि किणी पथकर नाक्याची वसुली यापूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होती. ती मुदत २ मे २०२२ या दिवशी संपणार होती; मात्र कोरोना महामारी आणि महापूर यांमुळे पथकर नाके बंद असल्याने या दिवसांची पथकर वसुलीची मुदत वाढवून २४ जून २०२२ पर्यंत ठेवण्यात आली होती. २५ जूनच्या मध्यरात्रीपासून हा पथकर नाका राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला असून प्राधिकरण यांचे उत्तरदायित्व पहात आहे.
संपादकीय भूमिकापथकर नाक्यावर केल्या जाणार्या दरवाढीवर प्रशासनाचा अंकुश कसा नाही ? |