कल्याण आणि नवी मुंबई येथे ए.टी.एम्. यंत्रे फोडल्याचे प्रकार; दोघांना अटक, ७ जण पसार

प्रतिकात्मक छायाचित्र’

ठाणे, २६ जून (वार्ता.) – कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि नवी मुंबई येथील खारघर हद्दीमध्ये अधिकोषांची ए.टी.एम् यंत्रे फोडून फरार झालेल्या ९ जणांच्या टोळीतील सरफुद्दीन रईस खान, उमेशकुमार प्रजापती या कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे, तर ७ पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या दोन्ही आरोपींकडून चारचाकी (कार), लुटलेली रक्कम असा एकूण २० लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. (कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नाही ! – संपादक)