ठाणे येथे ५ शिवसेना शाखाप्रमुख आणि युवासेना पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा नोंद

ठाणे, २६ जून (वार्ता.) – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबई आणि राज्यातील काही ठिकाणी बंडखोर आमदारांविरुद्ध स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि नेते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. २५ जूनला खासदार श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथे असलेले कार्यालय शिवसैनिकांनी फोडले होते. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये ५ शाखाप्रमुख आणि एक युवासेना पदाधिकारीचा यांचा समावेश आहे.

अंबरनाथ येथे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विरोधात फलक

एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय असणारे डॉ. बालाजी किणीकर यांच्या विरोधात फलक लावण्यात आले आहेत. अंबरनाथ शहरात असलेले उड्डाणपूल आणि मध्यवर्ती भागांत ‘हो मी गद्दार आहे’, असा संदेश लिहिलेले आणि डॉ. बालाजी किणीकर यांचे छायाचित्र असलेले फलक काही ठिकाणी चिटकवण्यात आले होते. अंबरनाथ पोलिसांनी हे फलक काढले आहेत.