भंडारा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेची हत्या !

अटक केलेले आरोपी

भंडारा – जादूटोणा करत स्वतःच्या पत्नीला मारल्याच्या संशयावरून आरोपींनी मित्राच्या साहाय्याने बबिता तिरपुडे (४५ वर्षे) या महिलेच्या डोक्यावर काठीने वार करत गळा दाबून तिची हत्या केली. ही घटना जिल्ह्याच्या नवेगांव येथे उघड झाली आहे. राजहंस कुंभरे आणि विनोद रामटेके अशी आरोपींची नावे आहेत.

कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव येथील बबिता तिरपुडे या २८ एप्रिल या दिवशी तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. बऱ्याच कालावधीनंतर ती परत न आल्याने कुटुंबांनी तिचा शोध घेतला, तेव्हा तिचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. डोक्यावर काठी मारून आणि गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते.

संपादकीय भूमिका

समाजातील लोकांना धर्मशिक्षण देऊन अंधश्रद्धा दूर झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !