कल्याणमध्ये कपड्यांच्या दुकानांतून ३२ सहस्र रुपयांच्या कपड्यांची चोरी !

महिलांची टोळी सक्रीय !

घटनास्थळाचे छायाचित्र (सौजन्य – टी.व्ही.९ मराठी)

ठाणे, १५ मे (वार्ता.) – कल्याण येथील बाजारपेठ परिसरातील दुकानांमध्ये दुकानदाराला नवीन कपडे दाखवण्यात गुंतवून ठेवून महिलांच्या एका टोळीने कपडे चोरले. त्यांनी ३२ सहस्र रुपयांचे कपडे चोरल्याचे समोर आले आहे. (गुन्हेगारीत आता महिलाही पुढे ! हे राज्याला लज्जास्पदच होय ! – संपादक)

दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. दुकानदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी चित्रीकरण पडताळून महिलांचा शोध चालू केला आहे. काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील कपड्यांच्या दुकानातही अशीच चोरी झाली होती.

संपादकीय भूमिका

अशांना पकडून लवकरात लवकर कठोर शिक्षा करणे अपेक्षित !