ताजमहालचे खरे स्वरूप उघड करणारी लेखमाला !
नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत. १४ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ताजमहाल शिवालय असल्याचा शासकीय पुरावा याविषयी वाचले. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखमालेतील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/579393.html
‘ताजमहाल’ हे शहाजहानच्या ५०० वर्षे आधी राजा परमार्दीदेवाने उभारलेले ‘तेजोमहाल’ नावाचे शिवमंदिर आहे. यासंबंधीचा संस्कृत शिलालेख ताजमहालच्या समोरच्या बागेत मधोमध उभारला होता. त्या शिलालेखात म्हटले आहे की,
प्रासादो वैष्णवस्तेन रचितोऽन्तर्वहन् हरिम् ।
मूर्ध्ना स्पृशति यो नित्यं पदम् अस्यैव मध्यमम् ॥
अकारयच्च स्फटिकावदातम् असाविदं मन्दिरमिन्दुमौलेः ।
न जातु यस्मिन् निवसन् स देवः कैलासवासाय चकार चेतः ॥
अर्थ : त्या राजा परमार्दीदेवाने एक राजवाडा बांधला ज्यात श्रीविष्णूंची मूर्ती होती. त्या मूर्तीच्या चरणांवर तो नेहमी नतमस्तक होई. शिवाय त्याने स्फटिकशुभ्र, निष्कलंक असे एक शंकराचे मंदिरही उभारले, जे इतके नयनरम्य होते की, त्यात विराजमान झाल्यावर भगवान शंकराला कैलास पर्वतावर परत जाण्याची इच्छाच उरली नाही.
वरील शिलालेख ताजमहालच्या बागेतच उभारला होता, हे ‘इदं मंदिरम्’ या उल्लेखावरून स्पष्ट आहे.
जयपूरचा राजा जयसिंह हा मोगलांचा मांडलिक म्हणून होता. त्याच्या मालकीच्या आगरा नगरीतील ‘तेजोमहाल’ शहाजहानने बळकावला. त्यात मुमताजचे शव पुरले. तेव्हापासून ‘तेजोमहाल’ नावाचे ते शंकराचे मंदिर ‘ताजमहाल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. १२१२ विक्रम संवताच्या त्या शिलालेखात यासंदर्भात स्पष्ट उल्लेख आहे. याचे सर्व विद्वान आणि सरकारी अधिकारी यांना विस्मरण होऊन ‘मुमताजची कबर’ म्हणूनच ताजमहालची निर्मिती झाली’, अशी अफवा पसरू लागून समस्त जनमानसात तीच रूढ झाली.’
(समाप्त)
– पुरुषोत्तम नागेश ओक (साभार : मासिक ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी अंक २००६, पृष्ठ ६२)
संपादकीय दृष्टीकोन
|