हिंदूंची बळकावलेली सर्व मंदिरे परत मिळवण्यासाठी सरकारने केंद्रीय कायदा करायला हवा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास अभ्यासक

‘कुतूबमिनार हे हिंदू आणि जैन यांची २७ मंदिरे पाडून बनवण्यात आले आहे’, असे भारतीय पुरातत्व विभागाने स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकात म्हटलेले आहे; मात्र या पुस्तकातील तथ्याच्या विरोधातील भूमिका त्यांनी न्यायालयात घेतली आहे. या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

मुंबई साखळी बाँबस्फोटातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या चौघांची अटक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या २९ वर्षांपासून गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या आरोपींचा शोध घेत होते.

युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी पोलंडला जागतिक निधीचे केंद्र बनण्याची इच्छा !

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे मोडकळीस आलेल्या युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी पोलंड जागतिक निधीचे केंद्र बनावे, असे वक्तव्य पोलंडचे उपपंतप्रधान जेसेक सॅसिन यांनी केले. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथून पलायन केलेल्या शरणार्थींपैकी तब्बल ३७ लाख शरणार्थींना एकट्या पोलंडने आश्रय दिला आहे.

ज्ञानवापी प्रकरणी ४ जुलैला पुढील सुनावणी

जिल्हा न्यायालयात ज्ञानवापीच्या प्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्षाने प्रलंबित राहिलेले म्हणणे ३० मे या दिवशी मांडले. यानंतर न्यायालयाने ४ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.

मुंबई येथे इमारतींच्या दुरुस्तीची कामे करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

अपघात झाल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याचे किंवा अपंगत्व आल्याच्या घटना घडल्या आहेत

‘जे.एन्.यू.’तील विद्यार्थिनीचा साम्यवादी विद्यार्थ्याकडून विनयभंग

साम्यवादी इतर वेळी स्त्रीमुक्ती आणि स्त्रियांचे हक्क यांविषयी गप्पा मारतात; मात्र ‘त्यांचे कार्यकर्ते स्त्रियांचे कसे शोषण करतात ?’, हेच यातून दिसून येते !

राष्ट्रहिताला प्राधान्य देत सर्बियाकडून रशियासमवेत नैसर्गिक वायूसंबंधी नवा करार !

सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष ॲलेक्झँडर व्युसिक यांनी रशियासमवेत ३ वर्षांचा नैसर्गिक वायूसंबंधी करार केल्याचे घोषित केले आहे. त्यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी नुकतीच चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये वायू कराराखेरीज अन्यही विषयांवर व्यापारासंबंधी विचार करण्यात आल्याचे व्युसिक यांनी सांगितले.

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून प्रतिमाह ४ सहस्र रुपये !

अनाथ झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे, त्यांना साहाय्य केले जाईल. त्यांना प्रतिमाह ४ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

अमरावती येथील सनातनच्या साधिका सौ. मनीषा पोहनकर ‘आचार्य’ पदाने सन्मानित !

या संशोधन कार्यात त्यांना अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरीचे वयोवृद्ध सचिव, तसेच वंदनीय राष्ट्रसंतांचे नीजी सचिव, भजनसाथी आणि छायाचित्रकार श्री. जनार्दनपंत बोथे यांनी राष्ट्रसंतांच्या जीवनगाथेतील अनेक प्रसंग सांगून अनमोल सहकार्य केले.

(म्हणे), ‘धर्माची गोळी दिली की, लोक झोपून रहातात हे त्यांना ठाऊक आहे !’ – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आजपर्यंत केवळ धर्म-जात यांच्या आधारावरच राजकारण केले. नेहमीच अल्पसंख्याकांना चुचकारण्याचे काम केले. आता हिंदू जागृत होत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पितळ उघडे पडत असल्याने जितेंद्र आव्हाड सारख्यांना पोटशूळ होऊन ते अशी वक्तव्ये करत आहेत, हे जनता ओळखून आहे !