संभाजीनगर येथे विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर नातेवाइकांची रुग्णालयात हाणामारी !

या वेळी सासर आणि माहेर यांच्या नातेवाइकांत हाणामारी झाली. या प्रसंगी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखून परिस्थिती स्वीकारण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !

राज्यातील २० सहस्रांहून अधिक परिचारिकांचे कामबंद आंदोलन !

परिचारकांचे कामबंद आंदोलन रुग्णांच्या जिवावर बेतण्यापूर्वी तात्काळ तोडगा काढणे अपेक्षित !

पुण्यामध्ये कोरोना संक्रमणातील ओमिक्रॉनच्या नव्या विषाणूचे ७ रुग्ण !

‘कोरोना कृती दला’चे सदस्य आधुनिक वैद्य राहुल पंडित म्हणाले, ‘‘ओमिक्रॉन प्रकारातील या विषाणूचा सध्या तरी फारसा धोका नाही. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली, तरी तिसऱ्या लाटेच्या तुलनेत हा वेग अल्प आहे.”

साधकांना भरभरून चैतन्य देणाऱ्या ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ (छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड ५) या सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन

भरभरून आनंद आणि चैतन्य देणाऱ्या या ग्रंथाचे प्रकाशन झाल्यामुळे साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य आठवणींचा अमूल्य ठेवाच उपलब्ध झाला आहे.

वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे, अशी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी येथे २९ मे या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सर्व पैलू समाजासमोर जाणीवपूर्वक येऊ दिले नाहीत ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

श्री. देवधर पुढे म्हणाले, ‘‘सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना हिंदुत्वाची शक्ती मिळाली. सावरकरांचेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत.’

पोलिसाने वाहनचालकाच्या कानशिलात लगावली !

वाहनकोंडीसाठी थेट सर्वसामान्य माणसावर हात उचलणे, हा पोलिसांचा उद्दामपणा झाला. परिस्थिती समजून न घेता पोलीस जनतेशी अशा प्रकारे अरेरावी करत असतील, तर पोलिसांचा जनतेला कधीतरी आधार वाटेल का ?

पाकिस्तानात चालते व्हा !

हिंदूंनाच या देशातून ‘चालते व्हा’ म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी आणि हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही पुढाकार घेतला पाहिजे. असे केल्याने हिंदूंनाच ‘तालिबानी’ म्हटले जाणार आणि खऱ्या तालिबानी विचारांच्या लोकांना कुरवाळले जाणार, हेही तितकेच खरे ! तरीही हिंदूंनी आता याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी वैध मार्गाने कृतीला प्रारंभ केला पाहिजे !

नांदेड येथे माजी मंत्र्यांच्या बंगल्यात बनावट बंदुकीसह तरुणाने घातला गोंधळ !

माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून आणि घरी काम करणाऱ्या पवार नावाच्या कामगाराला मारहाण करून गोंधळ घातल्याने शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी साहील माने याला अटक केली.

संभाजीनगर येथे वडिलांकडून पोटच्या मुलीवर ११ वर्षे अत्याचार !

नैतिकतेला काळीमा फासून वासनांनी पछाडलेल्या अशा लोकांना कठोर शिक्षाच हवी !