श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यातील संगमरवरी फरशी काढण्यास प्रारंभ !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात गाभार्‍यात बसवण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कामगार कोणत्याही यंत्राचा वापर न करता पारंपरिक हत्यारे वापरून फरशी काढणार आहेत.

महाराष्ट्रात घातपाताचा कट ?

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी एका वाहनात पोलिसांना एकूण ९० तलवारी सापडल्या. ही शस्त्रास्त्रे राजस्थान येथून जालन्याकडे नेण्यात येणार होती.

हिंदीला विरोध !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्वाेत्तर राज्यांमधील शाळांमधील हिंदीला आवश्यक विषय बनवण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आसामसहित अनेक राज्यांनी त्याला विरोध दर्शवण्यास प्रारंभ केला आहे.

३ लाख रुपयांची लाच घेतांना संभाजीनगर महापालिकेच्या गुंठेवारी कक्षप्रमुखांना अटक !

यावरून महापालिकेत भ्रष्टाचार किती मुरला आहे, हे स्पष्ट होते. महापालिकेत खालपासून वरपर्यंत असलेल्या भ्रष्टाचाराच्या साखळीत संबंधित दोषी वरिष्ठ अधिकार्‍यांनाही अटक केली पाहिजे.

इंग्रजीच्या बेडीत अडकलेली ‘मराठी’ !

साहित्य, पत्रकारिता, सामाजिक माध्यमे, प्रशासन, शासन या प्रत्येक ठिकाणी आणि सामान्य नागरिकही मराठी बोलतांना सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतांना आढळतात.

विभागीय क्रीडा संकुलाचे छत्रपती संभाजी महाराज हे नामकरण कायम ठेवण्याची मागणी

ज्या छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी प्राणत्याग केला असा दैदिप्यमान इतिहास असणार्‍या छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव क्रीडा संकुलाला देण्यासाठी आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी आहे. यात तातडीने लक्ष घालून ही मागणी पूर्ण करणे अपेक्षित आहे !

पुणे येथे धमकी देणारा व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी तरुणास अटक !

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पिंपरी येथील तेजस वायदंडेने, रणजीत चव्हाण आणि अजय या तडीपार गुंडांना हातात कोयता घेत धमकी देत असल्याचा एक व्हिडिओ ‘इन्स्टाग्रामवर’ प्रसारित केला होता.

साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस नाईक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

गुन्ह्याच्या अन्वेषणात साहाय्य करण्यासाठी तक्रारदाराकडे २५ सहस्र रुपयांची लाच मागितली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस नाईक यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप जाणा !

गुरुग्राम (हरियाणा) येथे अतिक्रमण हटवणार्‍या पथकावर दगडफेक केल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि स्थानिक नरगसेविका निशा सिंह यांच्यासह एकूण १० महिलांना न्यायालयाने ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.

हिंदूंनी सद्गुणविकृती सोडून शत्रूविरुद्ध आक्रमक होणे आवश्यक !

हिंदू स्वतःच्या अहिंसा, सहिष्णुता आणि उदारता आदी गुणांसाठी कट्टर होऊ शकतात; परंतु त्यांना स्वतःचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ संघर्षवादी होण्यापासून कोण रोखत आहे ?