भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या; मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’ हे समस्त हिंदू बांधव, हिंदु संघटना आणि हिंदू नेते यांच्यापुढील मोठे आव्हान आहे.

अब्दुल सत्तार यांना महसूल राज्यमंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री या पदांवरून हटवा !

जिल्ह्याचे पालकमंत्री असणार्‍या अब्दुल सत्तार यांचा हनुमानाविषयी अश्लील भाषेत विधाने करणारा व्हिडिओ प्रसारित झाला होता. यातून त्यांची धर्मांध मानसिकता दिसून येते. त्यांच्या विधानांमुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात महाराष्ट्रात रोखले १ सहस्र ३३८ बालविवाह !

राज्यामध्ये एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात राज्यातील विविध भागांमध्ये १ सहस्र ३३८ बालविवाह प्रशासनाने रोखले होते. बालविवाहांची होणारी संख्या लक्षात घेता आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणार्‍या विवाहांवरही …

तुळजापूर खुर्द (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात !

तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा कळसारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने २६, २७ आणि २८ एप्रिल या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने घट !

उजनी धरणाचा पाणीसाठा ३० टक्क्यांनी खाली म्हणजेच २९.५१ टक्क्यांवर आला असून धरणात केवळ १५.८१ टी.एम्.सी. उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे.

महाराष्ट्रात ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चित्रपटगृहे अनुपलब्ध ! – दिग्दर्शकाची खंत

आशयघन आणि ऐतिहासिक विषय असणार्‍या मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात, विशेषतः छत्रपती शिवरायांच्या राज्यातच चित्रपटगृहे मिळत नाहीत. त्यासाठी सतत संघर्ष करावा लागणे दुर्दैवीच !

मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष अन् गड-दुर्ग यांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय !

शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील मद्यालये आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष, तसेच गड-दुर्ग यांनी नावे न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

पुण्यात अक्षय्य तृतीयेला होणार्‍या मनसेच्या महाआरतीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्यातील सर्व मंदिरांत ३ मे या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेला महाआरती करण्यात येणार असून त्यामध्ये मनसैनिकांसह विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्यासह संलग्न असलेल्या ७ ते ८ संघटना कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

महामार्गावर वेगमर्यादा वाढवण्याची आवश्यकता ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

‘‘गाडीला वेगमर्यादा असलीच पाहिजे याविषयी माझा विरोध नाही; मात्र वेगमर्यादा किती असावी ? यावर विचार व्हायला हवा. आता ज्या पद्धतीने दंड वसूल केला जात आहे, त्याला माझा विरोध आहे.

मूल्यवर्धित कर विभागातील अधीक्षक आणि निरीक्षक यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक !

मूल्यवर्धित कर विभागातील (जी.एस्.टी.) अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे.