साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस नाईक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

गुन्ह्याच्या अन्वेषणात साहाय्य करण्यासाठी लाच मागितल्याचे प्रकरण

(प्रतिकात्मक छायाचित्र)

अंबाजोगाई (जिल्हा बीड) – गुन्ह्याच्या अन्वेषणात साहाय्य करण्यासाठी तक्रारदाराकडे २५ सहस्र रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ सहस्र रुपये लाच घेण्याचे निश्चित झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील साहाय्यक उपनिरीक्षकांसह पोलीस नाईक यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस नाईक नितीन चंद्रकांत चौरे आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद प्रताप सेंगर यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. चौरे आणि सेंगर यांनी तक्रारदारास त्यांच्या कुटुंबियांवर शेतीच्या कारणावरून नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अन्वेषणात साहाय्य केले, तसेच पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी २५ सहस्र रुपयांची मागणी केली होती.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र !