महाराष्ट्रात पुढील ५ दिवसानंतर पुन्हा उष्णतेची लाट !

एप्रिल मध्ये नागपूरसह विदर्भातील तापमान ४५ अंश सेल्यसिअसच्या पुढे गेले होते. आता मे मध्येही उकाड्यापासून कोणताही दिलासा मिळणार नाही. मे मासात उकाडा कायम रहाणार आहे. पुढील ५ दिवसानंतर विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट …

पुणे ते नाशिक ‘सेमी हायस्पीड’ प्रकल्प अंतिम संमतीकरता केंद्राकडे पाठवला !

या प्रकल्पासाठी मार्गातील १०२ गावांतील १ सहस्र ४७० हेक्टर भूमी लागणार आहे. गावातील भूसंपादन आणि संरेखनासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण होत असून ५ गावांतील भूसंपादनही झाले असून त्याचा योग्य मोबदलाही भूमीमालकांना दिलेला आहे.

झळा या लागल्या जिवा..

जीवनशैली पालटण्यासाठी साधना करणाऱ्या व्यक्तीला त्याग करण्यास कोणतीही समस्या नसते; मात्र ज्याला उपभोग घेण्यात अधिक आवड असते, त्याला अवघड जाते. जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी साधनेतून निर्माण होणारा त्याग आता अत्यंत आवश्यक ठरणार आहे. अशा त्यागी जिवांचे रक्षण निसर्ग करील, यात शंका नाही; कारण हिंदु धर्मानुसार निसर्गातही देव आहे !

सोलापूर येथे पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘इफ्तार पार्टी’ !

पोलिसांनी हिंदु सणांच्या वेळी हिंदु विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे स्वत:च्या घरी विशेष कार्यक्रमाचे आयोजन कधी केले आहे का ? हीच आहे का पोलिसांची धर्मनिरपेक्षता ?

निधर्मीवादी यावर का बोलत नाहीत ?

चटगाव (बांगलादेश) येथे आयोजित करण्यात आलेल्या एका ‘इफ्तार पार्टी’त सहभागी न झाल्यावरून ‘बांगलादेश हिंदु बौद्ध ईसाई ओक्या परिषदे’चे दक्षिण चटगावचे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र गुहा यांना धर्मांधांकडून एका झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.

कौटुंबिक छळ का ?

‘राज्य महिला आयोगा’ने उपाययोजनांसमवेत धर्मशास्त्र समजून घेऊन महिलांसह संपूर्ण कुटुंबाला साधना करण्यास प्रवृत्त केल्यास खऱ्या अर्थाने समस्या सुटतील. यासाठी संबंधितांनीही साधना करून अनुभूती घेतल्यास याचे प्रबोधन चांगल्या प्रकारे होईल, हे निश्चित ! सरकारने यामध्ये लक्ष घालून हिंदूंना धर्मशिक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष दिल्यास खरा विकास होईल.

शिलालेखातील पुरावे, तसेच भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोधनांचे दाखलेही सांगतात ‘गोवा ही परशुरामभूमीच !’

प्रसिद्ध गोमंतकीय इतिहास संशोधक अनंत रामकृष्ण शेणवी धुमे यांच्या ‘द कल्चरल हिस्टरी ऑफ गोवा फ्रॉम १०००० बी.सी. – १३५२ बी.सी’ या ग्रंथातील ‘जिनेसीस ऑफ द लँड ऑफ गोवा’ या पहिल्या प्रकरणात ‘गोवा ही परशुरामभूमी कशी आहे’, हे सिद्ध केले आहे…

देशामध्ये निर्माण झालेल्या वीजटंचाईला कारणीभूत असणारे स्वार्थी राजकीय पक्ष !

१. तीव्र उन्हाळ्यात वीजटंचाई आणि कोळसा यांचे संकट निर्माण होणे सध्या भारतामध्ये तीव्र उन्हाळा आहे. त्यामुळे पंखे, कूलर, वातानुकूलीन यंत्रे यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. साहजिकच विजेची मागणीही प्रचंड वाढली आहे. विजेचा वापर अत्यधिक प्रमाणात असल्याने मे मास चालू झाला असतांनाच विजेची टंचाई भासू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये भारनियमन केले जात आहे. विजेची मागणी … Read more

गोव्याचा रक्षणकर्ता फ्रान्सिस झेवियर नव्हे, तर भगवान श्री परशुराम !

मुक्त गोव्यामध्ये इतिहासाच्या, राष्ट्रीयतेच्या आणि मानवतेच्या निकषांवर कुठेही न बसणाऱ्या झेवियरला ‘गोंयचो सायब’ संबोधून तमाम गोंयकार, धर्मच्छलामध्ये बळी पडलेले आमचे पूर्वज आणि गोवा मुक्तीसाठी पोर्तुगिजांविरुद्ध लढून सर्वस्वाचे बलीदान केलेले स्वातंत्र्यसैनिक यांचा अपमान करणे यापुढे थांबले पाहिजे.

आज ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे लोकार्पण !

आता अधिक गतीने हिंदूसंघटन होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदू कृतीशील होवोत, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !