सोलापूर – येथे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी स्वत:च्या निवासस्थानी २९ एप्रिल या दिवशी रमजान मासामध्ये रोजे (उपवास) ठेवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन केले होते. पोलीस आयुक्त बैजल यांच्या निवासस्थानाच्या परिसरात यापूर्वी पक्षीघर उभारण्यात आले आहे. हे पक्षीघर पहाण्यासाठी सोलापूर येथील ‘सोशल उर्दू प्राथमिक शाळे’तील मुले पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी आली होती. त्या वेळी त्यांतील बहुतांश मुले रोजे ठेवत असल्याचे समजल्यानंतर बैजल यांनी मुलांना ‘इफ्तार पार्टी’चे निमंत्रण दिले.
या वेळी पोलीस आयुक्त बैजल यांनी ‘प्रत्येक धर्माचा सन्मान करणे आणि जगातील प्रत्येक माणसाला न्याय देणे, हेच खरे राष्ट्रप्रेम आहे. मुले ही खरी राष्ट्राची संपत्ती आहे’, असे विचार मांडले.
संपादकीय भूमिकापोलिसांनी हिंदु सणांच्या वेळी हिंदु विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे स्वत:च्या घरी विशेष कार्यक्रमाचे आयोजन कधी केले आहे का ? हीच आहे का पोलिसांची धर्मनिरपेक्षता ? |