बनावट आणि खोटे दाखले देणार्‍या पुण्यातील महसूल विभागातील अधिकार्‍यांवर कारवाई केव्हा ? – नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची मागणी

अवैध दस्त नोंदणी प्रकरणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे ४४ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हिंदु हिताचे कायदे निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – सतीश कल्याणकर, माजी सदस्य, सेन्सॉर बोर्ड

चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हिंदूंना वाईट प्रवृत्तीचे दाखवण्यात येत असून अहिंदूंची प्रतिमा उंचावण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये भारतभरातून अभिनेत्री बनण्यासाठी चित्रपटसृष्टीमध्ये आलेल्या १ सहस्र २०० मुली अनैतिक मार्गाला लागल्या आहेत.

भारत हिंदु राष्ट्र घोषित झाला, तर वर्षभरात १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती  

‘आम्ही लाठी, बंदुकीची गोळी आणि बाँब यांच्या आधारावर नाही, तर प्रेम, सिद्धांत, वस्तूस्थिती आणि इतिहास यांच्या आधारावर संपूर्ण आशिया खंडाला ‘हिंदुमहाद्वीप’ म्हणून घोषित करू इच्छितो’, असे शंकराचार्य म्हणाले.

‘एक्सप्रेस फीडर’चे प्रलंबित काम मार्गी लावणार !

२ कोटी रुपयांच्या या कामांतील सव्वा कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे; मात्र वीजेचे केबल (वायर) चोरीला गेल्याने काम रखडले आहे. आता उर्वरित कामाची निविदा काढून प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे, असे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

श्रीलंकेत आणीबाणी लागू !

देशात चालू असलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे महिंदा राजपक्षे यांनी अर्थमंत्री बेसिल राजपक्षे यांना पदावरून हटवले आहे.

भारत-पाक सीमेवर २०० आतंकवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात ! – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

जिहादचा पुरस्कर्ता असलेल्या पाकच्या मुसक्या आवळणे, हाच या समस्येवरील कायमस्वरूपी तोडगा आहे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लक्षात न येणे लज्जास्पद !

नागराजू यांची हत्या इस्लामविरोधी ! – ओवैसी

लव्ह जिहादच्या बळी सहस्रावधी हिंदु मुलींना बळजोरीने इस्लाम स्वीकारायला लावणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांची हत्या करणे, हे सर्व इस्लामविरोधी आहे, असे ओवैसी का म्हणत नाहीत ?

शेकडो मुसलमानांनी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण रोखले !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना न्यायालयाच्या आदेशाची अशा प्रकारे दिवसाढवळ्या अवहेलना होते आणि तेही हिंदूंच्या धार्मिक प्रश्‍नाच्या संदर्भात, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

छत्रपती संभाजी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करणार ! – पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका

जलपर्णीच्या समस्येसमवेतच तलावाच्या सर्व बाजूंना जाळी लावण्यात आलेली नसल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना धोका असल्याचेही या वेळी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागले !

यामुळे मुंबईत १४.२ किलो वजनाचा सिलिंडर आता ९९९ रुपये ५० पैशांना मिळणार आहे. यापूर्वी मार्च मासामध्येही सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती.