नागराजू यांची हत्या इस्लामविरोधी ! – ओवैसी

भाग्यनगर येथील मुसलमान मुलीच्या हिंदु पतीच्या हत्येचे प्रकरण

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे ४ मे या दिवशी नागराजू नावाच्या हिंदु युवकाची त्यांच्या मुसलमान पत्नीच्या नातेवाइकांनी हत्या केली. या पार्श्‍वभूमीवर ‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या घटनेला ‘इस्लामविरोधी’ असल्याचे म्हटले आहे. ओवैसी म्हणाले की, हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह करण्यासाठी दोघांनी हिंदू असणे आवश्यक आहे. मुसलमानांमध्ये मुसलमान पुरुष आणि स्त्री यांच्यातच ‘निकाह’ होऊ शकतो. हा शरीयत कायदा आहे. हिंदु विवाह कायद्याच्या अंतर्गत ‘विशेष विवाह कायद्या’ची सुविधाही आहे. नागराजूच्या प्रकरणात मुसलमान मुलीने तिच्या इच्छेनुसार विवाह केला. याला कायद्याने अनुमती आहे. तिच्या भावाला कोणताच अधिकार नाही की, त्याने तिच्या पतीची हत्या करावी. कायद्यानुसार हा गुन्हा आहे. इस्लाममध्ये यास मोठा अपराध समजले जाते. माझा पक्ष या कृत्याचा निषेध करतो.

संपादकीय भूमिका

जर असे असेल, तर लव्ह जिहादच्या अंतर्गत गोवण्यात आलेल्या सहस्रावधी हिंदु मुलींना बळजोरीने इस्लाम स्वीकारायला लावणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांनी विरोध केल्यास त्यांची हत्या करणे, हे सर्व इस्लामविरोधी आहे, असे ओवैसी का म्हणत नाहीत ? की इस्लामनुसार त्यांस मान्यता आहे, असे समजावे ?