श्रीलंकेत आणीबाणी लागू !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेची स्थिती दिवाळखोरीकडे जात असल्याने तेथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या त्यागपत्राची मागणी यापूर्वीच केली आहे. आता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. देशातील बिघडत असलेली स्थिती आणि राजकीय अस्थिरता यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

श्रीलंकेतील सामान्य जनतेने आर्थिक संकटाला राजपक्षे कुटुंबाला उत्तरदायी धरले आहे. राजपक्षे यांच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान, राष्ट्रपती, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि क्रीडामंत्री ही पदे राजपक्षे कुटुंबाकडे आहेत. देशात चालू असलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे महिंदा राजपक्षे यांनी अर्थमंत्री बेसिल राजपक्षे यांना पदावरून हटवले आहे.