हिंदुहिताचे कायदे निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – सतीश कल्याणकर, माजी सदस्य, सेन्सॉर बोर्ड
चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हिंदूंना वाईट प्रवृत्तीचे दाखवण्यात येत असून अहिंदूंची प्रतिमा उंचावण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे.
चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हिंदूंना वाईट प्रवृत्तीचे दाखवण्यात येत असून अहिंदूंची प्रतिमा उंचावण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे.
भोर तालुक्यातील दिवळे गावातील ग्रामदैवत असणाऱ्या देऊळजाईमाता मंदिरातील देवीचे सवा किलो वजनाचे चांदीचे दोन मुखवटे आणि चांदीचे आवरण असलेली देवीची मूर्ती असा एकूण ५८ सहस्र किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरजवळील पुरातन श्री भैरवनाथ मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक कोटी रुपयांचा निधी मान्य केला आहे.
निवडणुकीच्या कालावधीत घोषणांची खैरात करणाऱ्या नेतेमंडळींची जनतेला आता सवय झाली आहे; मात्र आता घोषणांसह ‘पोस्टरबाजी’चाही (भित्तीपत्रकांचा) अतिरेक आपणाला पहायला मिळतो.
कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने या बंदीवानांना येत्या १५ दिवसांत कारागृहात परतावे लागणार आहे. त्याविषयीचा आदेश शासनाने काढला असून या आदेशाच्या विरोधात अनेक बंदीवानांचे अधिवक्ते न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहेत.
एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी रहाणाऱ्या ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. ‘मुलीला शॅम्पू आणून दे’, असे सांगून तिला घरात बोलावून नराधमाने हे कृत्य केले आहे
सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे शहरातील अंदाजित ४५० मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर हनुमान चालिसा म्हणत आंदोलन करू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांना निवेदनाद्वारे दिली आहे.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना ध्वनीक्षेपकाच्या अनुमतीसाठी आवाहन करण्यात आलेले आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत जिल्ह्यात कुठेही ध्वनीक्षेपकाचा वापर होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या कालावधीत कोणत्याही धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय कार्यक्रमास अनुमती नाही
येथे शहरात ३ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.