सांगलीतील २९१ मशिदींनी ध्वनीवर्धकाच्या अनुमतीसाठी अर्ज केला नाही !

मशिदींवरील अनधिकृत ध्वनीवर्धक उतरवण्यासाठी मनसेच्या आंदोलनानंतर येथील ४९५ मधील २९१ मशिदींनी अनुमतीसाठी अर्ज केलेला नाही. २०४ मशिदींनीच ध्वनीवर्धक वापरण्याच्या अनुमतीसाठी अर्ज केले आहेत.

पनवेल येथे क्षुल्लक कारणावरून एकाला मारहाण !

येथील सुकापूर पेट्रोल पंपावर आलेल्या एका व्यक्तीला दोघांनी काठ्यांनी आणि लाथेने मारहाण केली. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

रायगड येथील घोणसे घाटात खासगी बस दरीत कोसळून दोघे जागीच ठार, ३० जण घायाळ

येथील माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात  खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार झाले असून ३० प्रवासी घायाळ झाले आहेत.

पोलीस असल्याचे सांगून वयोवृद्ध महिलेला फसवणाऱ्या ४ आरोपींविरोधात गुन्हा नोंद !

चार अज्ञात आरोपींनी ठाणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली. त्यांनी पोलीस असल्याचे भासवून महिलेचे १ लाख २० सहस्र रुपये किमतीचे दागिने पळवले.

अमरावती येथे आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीला माहेरच्यांनी फरफटत नेले !

जिल्ह्यातील अंबाडा गावातील २२ वर्षीय युवकाने तालुक्यातील १९ वर्षीय युवतीसमवेत २८ एप्रिल या दिवशी आंतरजातीय प्रेमविवाह केला; मात्र मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता.

अकोला जिल्ह्यात १ सहस्र ३१८ भोंगे अनधिकृत !

जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर १ सहस्र ३१८ भोंगे लावण्यात आले आहेत; मात्र सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे अनधिकृत आहेत. केवळ अकोट येथील देवी मंदिरावरील भोंग्याची एकच अनुमती यापूर्वी घेण्यात आली आहे.

कल्याण येथे गोवंशियांचे मांस असणाऱ्या टेंपोवर कारवाई !

कठोर शिक्षेअभावीच धर्मांध गोवंशियांची हत्या करण्याचे धाडस करत आहेत.

नाशिक येथील मनसेच्या शहराध्यक्षांना अटक !

नाशिक येथे भोंग्यांच्या विरोधी आंदोलनात ठिकठिकाणी मशिदींसमोर ध्वनीक्षेपकांवर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना अटक केली होती.

या प्रतीकांचे रक्षण करा !

ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदूंच्या मंदिराशी संबंधित असलेली प्रतीके ‘तेथे मंदिर होते’, हे लक्षात येऊ नये; म्हणून ती नष्ट करण्यात येत आहेत, असा आरोप या संदर्भातील खटल्यातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी केला आहे.

लोकप्रतिनिधींवरील प्रलंबित खटले आणि सर्वपक्षीय सरकारांची उदासीनता !

लोकप्रतिनिधींवरील खटले त्वरित निकाली निघाल्यास स्वच्छ प्रतिमेच्या राजकारण्यांची संख्या वाढीस लागेल !