पॅरोलवरील ८०० बंदीवानांना कारागृहात परतण्याचा नाशिक मध्यवर्ती कारागृहाचा आदेश !

न येणाऱ्या बंदीवानांवर गुन्हा नोंद होणार !

नाशिक – कोरोनाच्या महामारीमुळे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाने पॅरोलवर सोडलेल्या ८०० बंदीवानांना पुन्हा कारागृहात उपस्थित व्हावे, असा आदेश दिला आहे. कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने या बंदीवानांना येत्या १५ दिवसांत कारागृहात परतावे लागणार आहे. त्याविषयीचा आदेश शासनाने काढला असून या आदेशाच्या विरोधात अनेक बंदीवानांचे अधिवक्ते न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहेत. बंदीवान कारागृहामध्ये न आल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा, असा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.