मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे वादळी पावसाची शक्यता !
यंदा मान्सून १६ मे या दिवशी अंदमानच्या समुद्रात आला आहे. तो केरळमध्ये २७ मेपर्यंत पोचेल. त्यामुळे पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि अंदमान-निकोबारमध्ये पोषक हवामान सिद्ध होत आहे.
यंदा मान्सून १६ मे या दिवशी अंदमानच्या समुद्रात आला आहे. तो केरळमध्ये २७ मेपर्यंत पोचेल. त्यामुळे पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि अंदमान-निकोबारमध्ये पोषक हवामान सिद्ध होत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या सामाजिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील न्यू कोंडली फेज-३ मधील शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या वेळी हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर), हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष), हिंदु जनजागृती समिती, तसेच समाजातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना उपस्थित होत्या.
आमच्यावरही अनेकदा आक्षेपार्ह पोस्ट आणि चुकीची टीका केली गेली. तेव्हा आम्हीही तक्रार केल्या. त्या वेळी कुणाला अटक केली गेली नाही, म्हणजे आक्षेपार्ह पोस्ट विशिष्ट नेत्याविषयी असेल, तरच आरोपींना अटक करून विविध गुन्ह्यांत अडकवले जाते का ?
सनातन संस्था जी साधना सांगते, त्याच मार्गाद्वारे मानवी जीवन, समाज आणि अंतिमत: राष्ट्र निर्मितीच्या कार्यात मोलाचा वाटा उचलला जाणार आहे. हा विश्वास सार्थ ठरवत सोलापूर येथे १५ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’साठी सहस्रोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला.
चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी मी ‘औरंगाबादचे संभाजीनगर’ नामांतर करण्यासाठी फडणवीस यांच्याकडे विनंती करायचो; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
नातीचे लैंगिक शोषण करणाऱ्या वृद्धाला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !
केतकी चितळे कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची आवश्यकता नाही. तिला मानावे लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. आमचा लढा प्रस्थापितांच्या विरोधात आहे.
अशी मागणी का करावी लागते ? संतांचे विडंबन थांबवण्यासाठी विडंबन करणाऱ्यांना शिक्षा होणारा कायदा होणे आवश्यक आहे.
अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेली आक्षेपार्ह पोस्ट वर्ष २०२० मधील असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. त्या वेळी ही पोस्ट अधिक प्रसारित झाली नव्हती. आता ही पोस्ट पुनर्प्रसारित करण्यामागे काही षड्यंत्र आहे का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.