आतंकवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काश्मीर विश्‍वविद्यालयातील १५ प्राध्यापक होणार निलंबित !

जेथे प्राध्यापक हे आतंकवादाला प्रसृत करण्यात सहभागी होत असतील, तेथील विद्यार्थ्यांना कशाचे बाळकडू दिले जात आहे, हे वेगळे सांगायला नको ! अशा सर्वांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !

केरळमध्ये दोघा भावांच्या हत्येप्रकरणी २५ जणांना जन्मठेप

केरळमध्ये दोन भावांच्या हत्येच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’च्या २५ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा ! एका मशिदीसाठी देणगी गोळा करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर दोघा जणांची हत्या करण्यात आली होती.

चिपळूण (रत्नागिरी) : ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांनी दाखवला ‘हिंदूऐक्याचा आविष्कार’

हिंदूंच्या उत्सव मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, गोहत्या, धर्मांतरण, लव्ह जिहाद आदी संकटांवर हिंदु राष्ट्र निर्मिती हा एकमेव उपाय आहे. या देशात हिंदुत्वाच्या विचारांचे ध्रुवीकरण होत आहे. याला बळकटी देण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्न करायला हवेत.

वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’

(म्हणे) ‘ज्ञानवापी मशीद होती आणि प्रलयापर्यंत असेल !’ – असदुद्दीन ओवैसी

ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणीही न्यायालयाचा आदेश मानावाच लागला होता. त्यामुळे ओवैसी यांनी कितीही थयथायट केला, तरी त्याला भीक घालण्याची आवश्यकता नाही !

युक्रेनला ‘नाटो’ सैनिकी साहाय्य पुरवणार !

युक्रेनी सैन्य रशियाशी शौर्याने लढत असल्याने ते युद्ध जिंकू शकते, असा विश्वास ‘नाटो’चे प्रमुख जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी व्यक्त केला.

मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे आयोजन !

सोनोवाल यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. भविष्यात भारताला ‘क्रूझ हब’ म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.