चेन्नई – तमिळनाडूच्या ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागा’कडून (Hindu religious and charity endowment department) होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी ‘अल्यायम् कपूम’ (मंदिरांचे रक्षण) यांच्या वतीने १४ मे या दिवशी वल्लूवर कोट्टम, चेन्नई येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर), हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष), हिंदु जनजागृती समिती, तसेच समाजातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना उपस्थित होत्या. या वेळी नगरसेविका सौ. उमा आनंदन् यांनी सरकारच्या हिंदु मंदिरांविषयीच्या धोरणांवर टीका केली. या बैठकीला ४०० हिंदूंनी उपस्थित राहून हिंदु एकतेचा परिचय दिला. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि आणि श्री. जयकुमार उपस्थित होते.