केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेली पोस्ट २ वर्षांपूर्वीची !

केतकी चितळे, शरद पवार

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेली आक्षेपार्ह पोस्ट वर्ष २०२० मधील असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. त्या वेळी ही पोस्ट अधिक प्रसारित झाली नव्हती. आता ही पोस्ट पुनर्प्रसारित करण्यामागे काही षड्यंत्र आहे का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.