तळमळीने सेवा केली, तर त्याची फलनिष्पत्ती वाढते ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपली साधना खडतर आणि कठोर असली, तरच ईश्वर प्रकट होईल. साधना करणे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. येत्या काळात साधनेविना तरणोपाय नाही. या काळात साधनेमुळेच मनोबल वाढेल. यासाठी आपण करत असलेली साधना गुणात्मक करूया.

नास्तिक शरद पवार यांनी हिंदु देवी देवतांचे बाप काढले आहेत ! – भाजपचे ट्वीट

नास्तिक शरद पवार यांनी हिंदु देवी देवतांचे बाप काढले आहेत. पवार नेहमीच हिंदु धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदु धर्माची अपकीर्ती केली नसती, जातीयवाद केला नसता, देवतांचा अपमान केला नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते

मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचारी निलंबित !

धाडीमध्ये मुंब्रा पोलिसांनी ६ कोटी रुपये घेतल्याच्या तक्रारीचे प्रकरण

चंद्रपूर येथील सी.एच्.एल्. रुग्णालयावरील निलंबनाची कारवाई महापालिकेडून मागे !

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांची अनुमती रहित करत नियमित सराव चालू करण्याच्या सूचना दिल्या होत्या

चौकशीसाठी नगररचना विभागाकडून टाळाटाळ ! : नाशिक येथील म्हाडा घोटाळ्याचे प्रकरण

महापालिका क्षेत्रामध्ये गरिबांना सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या सदनिकांच्या हस्तांतरणात घोटाळा झाला होता. त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. याविषयीचा प्रत्यक्ष स्थळ पहाणीचा अहवाल दिला जात नाही.

उत्पन्न वाढीसाठी बसस्थानकांच्या जागा भाड्याने देण्यासाठी एस्.टी. महामंडळ सर्वेक्षणाच्या सिद्धतेत !

आर्थिक स्थिती खालावल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी एस्.टी. महामंडळाकडून प्रयत्न चालू आहेत. या अंतर्गत बसस्थानकांच्या मोक्याच्या कोणत्या जागा भाड्याने देता येतील ? याविषयी सर्वेक्षण चालू आहे.

(म्हणे) ‘काही लोक जात आणि धर्माच्या माध्यमातून द्वेष निर्माण करत आहेत !’ – शरद पवार

‘शरद पवार यांनीच हे आरंभापासून चालू केले’, असे जर अनेकांना वाटत आहे, तर आता हे म्हणण्याचा पवार यांना अधिकार आहे का ?

कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !

या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, ‘इस्कॉन’, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, श्री संप्रदाय यांच्यासह विविध संप्रदाय सहभागी झाले होते.

मृत व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून ४७ लाख रुपयांची फसवणूक !

मृत व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून लघु पाटबंधारे विभागाच्या अंबरनाथ तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या कुशिवली धरणामध्ये भूसंपादित भूमीचा मोबदला लाटणाऱ्या चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कल्याण येथील गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘मायटोकन’ आस्थापनाचा संचालक अटकेत !

कल्याण शहर परिसरातील अनेक गुंतवणूकदारांना आभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली.